विठ्ठल पाटील लातूर

लातूर :-उदगीर तालुक्यातील हाळी-हंडरगुळी सह परिसरातील बहूतांश गावामध्ये फिल्टरचे पाणी विक्री करणा-यांनी आपले बस्तान बसविले असल्याचे दिसुन येते.माञ फिल्टर पाणी म्हणुन विक्री होणारे जार मधील पाणी शुध्द आहे का अशुध्द ? असा प्रश्न हे पाणी प्राशन करणारी जनता प्रशासनाला विचारत आहे.तर यावर वाॅच ठेवणारी यंञणा अद्यापही थंडगारच ! आहे. म्हणुन पैसे देऊन आरोग्य *खतरे*मे तर जात नाही ना.तसेच संबंधित जेष्ठ अधिकारी कारवाहीची *डेअरींग * दाखविणार कधी? 
फिल्टरचे शुध्द पाणी असल्याचा दावा करीत पाण्याचा धंदा करणारे या भागात बहूतांश गावात दिरतात. यापैकी अनेकाकडे रितसर परवानाच नसल्याचे समजते.व प्रशासनातील *खादाड गुण*अंगात असलेल्यांशी   "दोस्ती" करुन अनेकजण फिल्टर प्लाॅंट चालवितात.म्हणे ! आणी जार मधील पाणी अनियंञितच असुन सं. अधिका-याला "थंडगार" करीत जार च्या पाण्याचा आता अनेकांनी काळा धंदा ही सुरु केला आहे.आणी हे धंदे करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळतात.व संबंधित अधिका-याशी ताळमेळ जमवतात.
जल ही जीवन है,तसेच जल है तो कल है,असे म्हटले जाते.माञ मागील कांही वर्षापासुन उदगीर शहरासह हाळी परिसरातल्या कांही गावामध्ये गुण नियंञण विभागाने पाणी नमुना तपासणी करण्याचे साहस दाखविले नसल्याने फिल्टर पाण्याच्या नावाने अशुध्द पाणी विक्रीचा धंदा जोरदार चालत असल्याचे दिसते.व उदगीर शहरासह हंडरगुळी गाव परिसरात हा धंदा करणा-यांपैकी कितीजणांकडे परवाना आहे.व कितीजणांकडे नाही. याचा शोध प्रशासन का घेत नाही.हे एक कोडेच आहे.आणी याचा शोध घेतल्यास जार मधील पाण्याची खरी गुणवत्ता उघड होईल.आणी फिल्टरचे पाणी शुध्द असते.असे समजुन डोळे मिटून पाणी पिणा-यांचे डोळे उघडे होतील.तेंव्ला संबंधित अधिका-यानी प्रामाणिकपणा दाखवावा.आणी जार मधील पाण्याचे व विक्रेत्यांचे खरे रुप जनतेसमोर आणावे.तसेच जल ही जीवन असलेले जार मधील हेच जल  कधी कुणाचा घात करेल.हे नाकारता येत नाही.वाडी,तांडे आदी गावातील घरगुतीसह सामुहिक कार्यात जारचे पाणी वापरले जाते.आॅर्डर प्रमाणे विक्रेते पाणी देतात.आणी फिल्टरचे पाणी समजुन कांहीजण पन्नास,शंभर जारची आॅर्डर देतात.व या जारमुळे पाहूण्यारावळ्यात वट बसते.असे कांहींना वाटते.माञ अर्धेअधिक जार मध्ये फिल्टर न केलेले पाणीच असते. म्हणजे बहूतांश जार मध्ये अर्धे पाणी फिल्टरचे तर अर्धे विना फिल्टरचे अशाप्रकारचे ढसळमिसळ असलेले पाणी सर्रासपणे विकतात.आणी जार मधील पाणी आहे,असे समजुन डोळे झाकुन अनेकजण पितात.यामुळे हे पाणी खरोखरच शुध्द असते का ? या प्रकरणाच्या खोलात जाणार कोण ? व गेल्यावर उदगीर शहरासह हाळी हंडरगुळी भागात मिळून शेकडो अवैध व अशुध्द प्लांट उघड होणार . यात शंका नाही.तेंव्हा आर.ओ.प्लांट च्या शुध्दतेच्या मानकांचे पालन होते का नाही.याचा उलगडा होणार आणी जनतेचे आरोग्य ठणठणीत राहणार .