हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
भंडारा :-मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या शाळेत रक्षाबंधन निमित्ताने शाळेतील विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला. त्यासोबतच वृक्ष रक्षाबंधन उपक्रम घेण्यात आला.
भारतीय संस्कृतीत राखी पौर्णिमा या सणाला बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणून भावांना राख्या बांधतात, बहिणीचे रक्षण करावे, त्यांच्या प्रिय भावास दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात.
या संदेशातून इको क्लब च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक स्वनिर्मित, कल्पनेतून साकारलेल्या राख्या पर्यावरणाचे संवर्धन व रक्षणाचा संदेश देणाऱ्या राख्या शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने, आनंदाने शालेय परिसरातील वृक्षा साठी वृक्ष राख्या तयार केल्या. सर्वप्रथम वृक्षांची पुजा करून, शालेय परिसरातील सिसम, कडुलिंब आदी वृक्षांना राख्या बांधल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी वृक्षाचे रक्षण करण्याची शपथ घेतली. त्याच बरोबर वृक्ष आमचे भाऊ, त्यांनी दिर्घायुषी राहावे व प्रदुषणा पासून आमचे रक्षण करावे यासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांनी वृक्ष रक्षाबंधन निमित्त वृक्षाचे महत्त्व विशद करून सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव हिरालाल गजभिये, मुख्याध्यापक नरेंद्र गणवीर, सुनिल नागदिवे, सुमिता गजभिये, निर्मला रंगारी, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे, प्रा. नाना गजभिये, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुमिता गजभिये यांनी केले.


0 टिप्पण्या