Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र पाण्याखाली आणी हाळी - हंडरगुळीची तिरु नदी जोत्याखाली..


विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-एकीकडे राज्यातील अनेक लहान - मोठे गाव,शहरं तसेच नद्या व प्रकल्प हे संततधार , मुसळधार पडणा-या पावसाच्या पाण्याखाली सापडल्याचे पेपर व टी.व्ही.चॅनल मधील बातम्यां मधून दिसत आहे.माञ याच राज्यात असलेल्या उदगीर तालुक्यातील हळी हंडरगुळी येथील तिरु नदीला अद्याप एकही पुर आला नाही.म्हणुन या तिरु नदीचे पाञ जोत्याखाली आहे.यामुळे सामान्य जनता व शेतकरीबंधू चिंतेत दिसतात.अॅगस्ट संपत आला तरी ही एकही मोठा पाऊस पडला नसल्याने या नदीच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही.परिणामी सगळ्यांचे "टेंन्शन" वाढत चालले असुन आता परतीचाच पाऊस या नदीत पाणीसाठा वाढवू शकेल.असे जाणकारात चर्चा आहे .
# हाळी-हंडरगुळी येथील तिरु नदीचे डोंग्रज ता.चाकुर जि.लातुर येथे उगम स्थान आहे,व या नदीचे शेवटचे टोक हे नांदेड जिल्ह्यात असल्याचे कळते. यामुळे या नदीवर हजारो एकर शेती व अनेक गावातील जनतेसह गुरांची तहान भागते.माञ,यंदा आजवर खुप वेळा छोटा,मोठा पाऊस झाला.तरीही या नदीला एकदाही पुर आला नाही. म्हणुन या नदीचे पाञ जोत्याखालीच असल्याची माहिती नुकतीच संबंधित विभागाने जाहीर केली.त्यामुळे हाळी व परिसरातील जनतेला आगामी उन्हाळा कसा असेल.याचाच विचार सतावतोय.
यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तसा पाऊस ब-यापैकी पडत असल्याचे व सध्या खरीप पीके चांगली दिसत असली तरीही नदीचे पाञ पाण्याअभावी जोत्याखालीच दिसत आहे.म्हणुन शेतकरीबांधवां सह आमआदमी मधून चिंता व्यक्त होत आहे.*परतीचा पाऊस ठरणार तारणहार* यंदा पावसाचे 3 महिने संपले तरीही या नदीला एकही पुर आला नाही.माञ यापुर्वी अनेकदा परतीचा पाऊस धावुन आला आणी ही नदी भरली होती.म्हणुन यंदा पण सगळ्यांची आशा असलेला परतीचा पाऊस हा तारणहार ठरेल.अशी एक आस जनतेच्या मनात आहे.*बेसुमार उपश्यामुळे जलसाठा कमी* यंदा उन्हाळ्यात या नदीपाञात भरपुर पाणी होते.पण त्या पाण्याचा बेसुमार उपसा परवानाधारक व विनापरवाना धारक शेतक-यांनी केल्यामुळे नदीचा जलसाठा पावसाचे दिवस सुरु होण्या - पुर्वीच संपला.त्यात गाळ उपसा ही मोठ्याप्रमाणात केल्याने नदीपाञात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले अन् गत वर्षीपेक्षा जास्त पाण्याची गरज निर्माण झाली आहे.पण अद्यापपर्यंत एकही पुर आला नसल्याने तिरुनदीचे पाञ जोत्याखालीच आहे.तेंव्हा तिरु नदीचे पाञ पाण्याने भरुन जाईल का व कधी ? याकडे जनतेचे लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या