कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निलागोंदी येथे इयत्ता 1ली ते 4थी असून विद्यार्थी संख्या 69 आहे. शाळेचे कामकाज योग्य रीतीने चालावे. तथा पालक व शिक्षकांत समन्वय असावा. या करिता शाळा समितीची स्थापना केली जाते. या समितीचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो. शाळा समितीची मुदत संपल्याने नवीन शाळा समिती गठीत करण्यासाठी मंगळवार(ता.6 ऑगस्ट) रोजी सकाळी 8:00 वाजता शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच वर्षा वंजारी निलागोंदी, प्रमुख उपस्थितांमध्ये उपसरपंच महेश का. हटवार, तमुस अध्यक्ष यशोराज हटवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती हटवार, दिनेश वंजारी, माजी अध्यक्ष सचिन बन्सोड, माजी उपाध्यक्ष विलास भुरे, सामाजिक कार्यकर्ता दिलहर बन्सोड, मुख्याध्यापक अशोक यळमे, सहा.शिक्षक दादाराम वंजारी, क्रांतीलाल पटले यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी महेश हटवार, उपाध्यक्ष योगेश पडोळे, सदस्य शिशुपाल वरठे, विलास हटवार, अस्विनी शेंडे, रुपाली वंजारी, भाग्यश्री ठाकरे, रंजू वंजारी, जयश्री बन्सोड, शिक्षक तज्ञ अंगणवाडी सेविका अंतकला बन्सोड, सहाय्यक शिक्षक दादाराम वंजारी, सचिव म्हणून मुख्याध्यापक अशोक यळमे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पालकांचे वतीने नवगठित शाळा समितीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.पालक सभेचे संचालन सहा.शिक्षक क्रांतीलाल पटले यांनी केले.


0 टिप्पण्या