Ticker

6/recent/ticker-posts

मनुष्यबळाअभावी पीएम किसान सन्मान योजनेचे काम ठप्प

• तालुका कृषी अधिकारी कार्यालय लाखनी येथील प्रकार


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यासह जिल्ह्यातही मनुष्यबळाअभावी शेतकरी सन्मान निधी योजनेची कामे कृषी विभागामार्फत ठप्प झाली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डेटा एंट्रीतील चुका आणि ई-केवायसी दुरुस्तीचे काम, नवीन लाभार्थी अर्ज हे काम थांबले आहे.यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत येऊन योजनेच्या निधीला मुकावे लागणार आहे. शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यभरात सर्व प्रथम आधी ही योजना महसूल विभागाकडे होती. महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभाग अशा संयुक्त विद्यमाने त्याचे काम होत होते. शेतकऱ्यांच्या नावाचा डेटा महसूल यंत्रणेने डाऊनलोड केला आहे. ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी येत आहेत. याला कृषी विभागाला जबाबदार धरले जात आहे. योजना हस्तांतरित होण्यापूर्वी तांत्रिक मनुष्यबळाचा विचार होणे अपेक्षित होते. पुढे अधिवेशनामध्ये कृषिमंत्र्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अध्यादेश निघेपर्यंत मनुष्यबळाअभावी कामे ठप्प राहणार आहे. सदर योजनेची काम पाहण्यासाठी कृषी विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. पहिल्यांदाच रिक्त पदामुळे कृषी विभागाकडे “डोई येवढे जड" काम वाढल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली पण अजूनपर्यंत मनुष्यबळ मिळाले नसल्याने १ जुलै पासून या योजनेकडे दुर्लक्ष झाले.परिणामी शेतकरी सन्मान निधीपासून वंचित राहणार आहे.अतिरिक्त मनुष्यबळाचा अभाव असले तरी याला दुरुस्त करण्यासाठी लॅपटॉप नाही. या परिस्थितीत संपूर्ण योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित झाली आहे. ही योजना हस्तांतरित करताना कृषी विभागाला रिक्त पदे भरली जातील असा शब्द मिळाला होता. प्रत्यक्षात अतिरिक्त्त मनुष्यबळ मिळाले नाही. उलट अतिरिक्त काम वाढले. यातून योजनेच्या काम ठप्प झाले आहे.

प्रतिक्रिया

कृषी कार्यालयात अपुऱ्या रिक्त पदामुळे पिएम किसान योजनेची काम सांभाळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ पाहिजे. सोबतच लॅपटॉप किंवा संगणक आवश्यक आहे. त्याशिवाय कामकाज करणे अशक्य असल्याने या बाबींची पूर्तता होताच आम्ही कामाची गती वाढवणार. 

सुधीर वरकडे तालुका कृषी अधिकारी लाखनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या