• वेळेवर बस सोडण्याची शिक्षकांची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- येथून अवघ्या ६ किलोमिटर अंतरावर असलेले, विनोद विघालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली येथे जवळपास आजुबाजुच्या परिसरातील वर्ग ५वी ते १२वी पर्यंत चे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यात अर्जुनी, मेंढा, टेकेपार, तिड्डी, मकरधोकडा, तसेच भंडारा, गणेशपुर, पिंडकेपार, बेला, चांदोरी, मालीपार, पचखेडी, दवडीपार, खापा, गराडा, बासोरा व इतर गावावरून विघार्थी, विघार्थींनी भरपूर प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी नियमित येत आहेत.
परंतु आपली एसटी महामंडळाची बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक, बौद्धिक त्रास होत असून तीन ते चार तास सिल्ली बसस्थानकामध्ये थांबावे लागत आहे. आपली बस कधी-कधी ७.३० वाजता येत असते, त्यामुळे अनेक गावकरी आपल्या पाल्यांच्या भविष्यविषयी चिंतीत असल्याचे निदर्शनास आले आहे. करिता आपणास निवेदनाद्वारे कळविण्यात येत आहे की, सदर बस भंडारा ते बोरगाव ४:३० वाजता भंडारा वरुन सोडन्यात यावी. जेने करुन कोणत्याही परिस्थितीत विघार्थी, विघार्थींनीना, पालकांना मानसिक, बौद्धिक त्रास होणार नाही तसेच आजकाल मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींचे लैंगिक शोषन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आपण भंडारा ते बोरगाव ही एसटी वेळ ४:३० वाजता सिल्ली येथे पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण करावी. वाहतूक अधिकारी यांना निवेदन देताना प्रा. पी.जी. आत्राम, प्रा. आय.के. मोदनकर, प्रा. ए.जी.बांगळकर, सहाय्यक शिक्षक नितीन चांदेकर, डि.एन. मस्के तथा इतर महत्वाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या