Ticker

6/recent/ticker-posts

मोहाडी आयटीआय येथे संविधान मंदिराचे उदघाटन

कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
 भंडारा :- मोहाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेद्वारे मोहाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) येथे संविधान मंदिराचे आभासी माध्यमाने देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते रविवार(ता.१५ सप्टेंबर) रोजी आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मोहाडी येथील आय.टी.आय मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या शुभहस्ते मोहाडी पंचायत समिती चे सभापती रितेश भाऊराव वासनिक, प्राचार्य मलेवार, प्राचार्य देशमुख मैडम, सुभाष गायधने, नगरसेवक पवन चव्हान, मोहगाव देवी चे मोहगाव देवी सुधाकर रामटेके, कांन्हळगांव चे सरपंच जागेश्वर मेश्राम, धोटे सर, गुंजन जगनाड़े, ठवकर सर, पराते सर, आंबेकर मैडम, गड़पायले सर, मलेवार सर, गायधने सर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व पटवुन दिले. आपण सविधानाचे वाचन करुन आपले अधिकार काय याचा सुद्धा आपण अभ्यास करावा आणि देशाच्या प्रगतीला युवकांनी हातभार लावावा. असे आमदार राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या