Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार संजीव भांबोरे यांचा सत्कार


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- जिजाऊ महिला सहकारी पत संस्था मर्यादित चिचाळ, तालुका पवनी चे वतीने सामाजिक कार्यात विशेष योगदान दिल्या प्रीत्यर्थ समाज सेवक तथा पत्रकार संजीव भांबोरे यांचा वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षा मनीषा राजेश नंदपूरे, संस्थापक राजेश नंदपूरे, उपसरपंच जगतराम गभने आणि संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम नावाड्याच पोर ते राष्ट्रपती एक रोमहर्षक कहाणी हे पुस्तक भेट देऊन पत संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
                       जिजाऊ महिला सहकारी पत संस्था मर्यादित चिचाळ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार(ता.१४ सप्टेंबर) रोजी दुपारी १:०० वाजता घेण्यात आली. आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्वसाधारण सभेस सुरुवात करण्यात आली. संस्थापक राजेश नंदपूरे, अध्यक्षा मनीषा नंदपूरे, उपसरपंच जगतराम गभने, स्वीकृत संचालक चुन्नीलाल लांजेवार, ज्येष्ठ मार्गदर्शक जयराम दिघोरे व संचालक मंडळ तसेच सभासदांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यात समाजसेवक तथा पत्रकार संजीव भांबोरे तसेच इयत्ता १०वी व १२वी मध्ये प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मनीषा नंदपूरे, अहवाल वाचन व्यवस्थापक आकाश घटारे, संचलन मीनाक्षी लेंडे तर आभार मुकेश रामटेके यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मी डोकरे, वर्षा जीभकाटे, सुनंदा नंदपूरे, मंजुषा गभने, धनश्री लोहकर, अलका शस्त्रकार, पूजा रामटेके, रेखा शेंद्रे, प्रीती काटेखाये, चंदा शस्त्रकार यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या