Ticker

6/recent/ticker-posts

कुणबी युवा गुहागर - वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई :-मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ६.३० ते ९.०० या वेळेत कुणबी युवा गुहागर (मुंबई) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा गुहागर युवाध्यक्ष मा. श्री. सुनिल रु. ठोंबरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, सेंट झेविअर्स स्ट्रीट, परळ (पू) मुंबई येथे संघ सरचिटणीस व गुहागर शाखेचे माजी अध्यक्ष मा. श्री. कृष्णा वि. वणे साहेब, संघ सहसचिव मा. श्री. माधव ल. कांबळे साहेब, गुहागर शाखाध्यक्ष मा. श्री. अनंत स. मालप साहेब, संघ कार्यकारिणी प्रतिनिधी मंडळ सदस्य मा. श्री. बबन कांबळे साहेब, शाखाउपाध्यक्ष मा. श्री. शांताराम पागडे साहेब, तवसाळ गट अध्यक्ष मा. श्री. गिरीश बारस्कर साहेब, सचिव मा. श्री. बबन माटल साहेब, हेदवी गट अध्यक्ष मा. श्री. विवेक कातकर साहेब, सचिव मा. श्री. रविंद्र दवंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
        सर्वप्रथम महामानवांचे स्मरण करून मान्यवर व सभेला उपस्थित बांधवांचे स्वागत गुहागर युवा सचिव श्री. सुबोध हळये यांनी केले. त्यानंतर सभेची नोटीस व प्रास्ताविक वाचन केले. त्यानंतर मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तांतचे वाचन करण्यात आले व मंजुरीचा प्रस्ताव मांडण्यात आला सदर प्रस्तावास सभागृहातून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर युवक मंडळाच्या कार्य अहवालाचे वाचन युवा उपाध्यक्ष श्री. भुपेंद्र गोणबरे यांनी केले. अहवाला संदर्भात काही प्रश्न अथवा सूचना असल्यास त्या मांडण्याबद्दल आवाहन करण्यात आले. व नंतर कार्यअहवाल मंजुरीसंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला सदर प्रस्ताव मंजुरीचे अनुमोदन सभागृहातून घेण्यात आले. त्यानंतर  युवा खजिनदार श्री. संतोष फटकरे साहेब यांनी युवक मंडळाचा ३१ मार्च २०२३ पर्यंतचा जमाखर्च अहवाल वाचून सादर केला सदर जमाखर्च संदर्भात काही सूचना अथवा प्रश्न असल्यास ते मांडण्यासाठी सभागृहास वेळ देण्यात आला. विचारल्या गेलेल्या प्रश्नचे उत्तर युवा अध्यक्ष यांनी दिले नंतर मंजुरीचा प्रस्ताव मांडून त्यास सभागृहातून अनुमोदीत करून मंजूर करण्यात आला.
    सभेस उपस्थित सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले, शाखाध्यक्ष श्री. अनंत मालप साहेब यांनी युवक मंडळाच्या पुढील प्रवासात शैक्षणिक मार्गदर्शन, शेअर मार्केट अभ्यास व व्यवहार इत्यादी विषयांवर समाजात जास्तीत जास्त प्रबोधन करावे अशा सूचना देऊन शुभेच्छा दिल्या. संघ सरचिटणीस श्री. कृष्णा वणे साहेब यांनी कार्य व आर्थिक अहवाल अतिशय उत्तम असून युवक मंडळाच्या पुढील सर्व उपक्रमास शाखेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले सरचिटणीस श्री. सुबोध हळये यांची शाखेच्या सहसचिव पदी नियुक्ती झाल्यामुळे गुहागर युवक मंडळाच्या सरचिटणीस पदी श्री. संतोष फटकरे गाव - आबलोली तसेच खजिनदार पदी श्री. अविनाश शिगवण गाव - साखरी त्रिशुळ यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाहीर करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गुहागर युवाध्यक्ष श्री. सुनील ठोंबरे साहेब यांनी युवक मंडळाचे पुढील अनेक उपक्रम नियोजित केले असून त्यास सर्व युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा अशी आशा व्यक्त केली.
     युवक मंडळाचे मावळते सरचिटणीस श्री. सुबोध हळये यांनी सर्व सहकाऱ्यांचे बंधू-भगिनींचे आत्तापर्यंत मिळालेल्या सहकार्यानिमित्त आभार व्यक्त केले युवक मंडळाचे नवनिर्वाचित सरचिटणीस व खजिनदार यांचे अभिनंदन करून सभेस उपस्थित सर्व बांधवांचे आभार व्यक्त करून सभेची सांगता केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या