Ticker

6/recent/ticker-posts

धम्म हा माणसाच्या सुख दुःखासाठी केलेले संशोधन

 ज्येष्ठ साहित्यिक इ. मो. नारनवरे यांचे प्रतिपादन 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- मानवाच्या दैनंदिन जीवनातील मूल्ये जोपर्यंत धम्मसंस्कृतीत कार्यान्वित करणे, धम्मनुसार आचरण करणे,   त्रिसरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग, दहा परमिता, बावीस प्रतिज्ञा मानवीय जीवनाचे कल्याकारी स्रोत होय. मनाला सुसंस्कृत करणे, समता स्वातंत्र, बंधुता व न्याय हा धम्माचा विचार आहे. त्यामुळे धम्म हा माणसाने माणसाच्या सुख दुःखाचे संशोधन आहे. असे प्रतिपादन बुद्ध, आंबेडकरी विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक ई. मो. नारनवरे यांनी महाप्रज्ञा बुद्ध विहार मुरमाडी/लाखनी येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलते होते. 
                      आश्विन पौर्णिमेचे औचित्य साधून महाप्रज्ञा बुद्ध विहार मुरमाडी/लाखनी/सावरी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास समाप्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाप्रज्ञा बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुरेंद्र बनसोड, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई शहारे, प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध साहित्यिक तथा आंबेडकरी विचारवंत इ.मो. नारनवरे, आर्किटेक्ट-साहित्यिक व विचारवंत नरेंद्र शेलार यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्याअर्पण, मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलनाने धम्मोपदेशनास सुरुवात करण्यात आली. मुख्य वक्ते नरेंद्र शेलार यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की धम्म मध्यम मार्ग स्वीकार करावा, दरेकाने दरेकास दीक्षा द्यावी. मानवाने धम्म आचरणशील व्हावे. जो पर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासना करणार नाही तो पर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही व बौद्ध धम्म, संस्कृती रुजनार नाही. हा बदल स्वतः पासून सुरू करावा. असे सांगितले. त्यानंतर प्रमुख अतिथी जिल्हा महिला संघटीका प्रियाताई शहारे यांनी चुकीच्या प्रथा सोडाव्या, विवेक बुद्धीने परिवर्तन घडवून आणले पाहिजे असे मत महिलांना उपदेश करताना सांगितले. या धम्मोपदेशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेवाराम खोब्रागडे आणि आभार पी.एल. वैद्य यांनी मानले. सुरेंद्र बन्सोड,  रामप्रसाद देशपांडे, केशव रामटेके, सी के लेंढारे, प्राणहंस मेश्राम, आशिष गणवीर, विनय रामटेके, शालीक जांभुलकर, भुमेन्द्र रामटेके, गजेंद्र गजभिये, मारोती कावळे, सदानंद वासनिक, डॉ. सुरेश खोब्रागडे, नरेश इलमकर, प्रा.सतीश भोवते, नामदेव काणेकर, वर्षा तिरपुडे, ललिता बडगे, सुमन काणेकर, मीरा रामटेके, शर्मिला खंडारे, विना डोंगरे, संगीता तिरपुडे, संगीता वैद्य, लीला भीमटे, लता वैद्य, अक्षरा खोब्रागडे, पल्लवी खिल्लारे, बबिता शामकुवर यांचेसह बहुसंख्येने बौद्ध उपासक, उपासिका धम्मोपदेशनास उपस्थित होते. भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या