Ticker

6/recent/ticker-posts

साकोलीत अपक्ष उमेदवार अशोक पटले यांचे नामांकन दाखल

• हजारो समर्थकांची उपस्थिती 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरू आहे. गुरुवार(ता.२४ ऑक्टोबर) रोजी सामाजिक कार्यकर्ता तथा शेतकरी पुत्र अशोक सदाशिव पटले यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत वाजत गाजत बैलगाडीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी अश्विनी मांजे यांचेकडे अपक्ष नामांकन दाखल केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सूर्मिला पटले, सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक, लीलाधर बारस्कर, प्रदीप राहांगडाले, महेश पटले प्रामुख्याने उपस्थित होते. 
                         २६ नोव्हेंबर रोजी विद्यमान विधानसभेची मुदत संपुष्टात येत असल्याने निर्वाचन आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महाविकास आघाडी व महायुतीत जागा वाटपाबाबद एकमत होत नसल्यामुळे महायुतीचा उमेदवार ठरलेले नाही तर महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदारांनाच तिकीट जाहीर झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सामाजिक कार्यकर्ता तथा शेतकरी पुत्र अशी बिरुदावली असलेले अशोक पटले यांनी एका राजकीय पक्षात तब्बल २० ते २५ वर्षे काम केले. त्या पक्षाचे ते जिल्हा उपाध्यक्षही होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात ते येत असलेल्या जातीची मतदान संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांना हुलकावणीच देण्यात आली. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आपली सहचारीनी सूर्मिला पटले यांना अपक्ष उभी करून प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणले. अल्पावधीतच त्यांनी लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्राकरिता १६ कोटी २२ लाख ५४ हजार रुपयाची विकास कामे खेचून आणली. परिसर आणि क्षेत्राचा विकास आवश्यक असेल तर लोक प्रतिनिधी होणे आवश्यक असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ता अशोक पटले यांचे निदर्शनास आली. पण कोणत्याही पक्षाकडे तिकीट मागूनही मिळणार नसल्याचे खात्री असल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन गुरुवारी शेतकरी पुत्र या नात्याने हजारो समर्थकांच्या उपस्थितीत बैलगाडीने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय गाठून नामांकन अर्ज दाखल केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या