मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव: - दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय धाराशिव येथे 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग धाराशिवच्या वतीने मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते संविधानाची प्रस्ताविका देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव मॅडम समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत साहेब, कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी कोनाळे साहेब यांच्या उपस्थिती हा गौरव करण्यात आला .यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या गौरवाचे समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे.


0 टिप्पण्या