Ticker

6/recent/ticker-posts

कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज यांच्यावतीने विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन


चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज यांच्यावतीने मौजे खंडाळी ता. माळशिरस येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  
विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन खंडाळी गावच्या सरपंच सौ. सुनीता सुरवसे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री.बापूराव अंकलगी यांनी केले. याशिबिरामध्ये परिसर स्वछता, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर , व्याख्याने अश्या  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
याप्रसंगी खंडाळी‌चे माजी उपसरपंच श्री. रिकेश चव्हाण व  ग्रामपंचायत सदस्य श्री.अमर रिस्वडकर यांनी आपले मनोगत व्यक्त  केले. उदघाट्न प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  अनिल भानवसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी  उपसरपंच अनिल भोसले, माजी सरपंच बाबुराव पताळे, माजी उपसरपंच रिकेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमर रिसवडकर, विठ्ठल पताळे, महादेव साबळे, आप्पासाहेब पताळे, पोलीस पाटील डॉ कटके, ग्रामविकास अधिकारी सत्यवान पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. खंडाळी गावाचे सरपंच तसेच सर्व सदस्यांनी शिबिरासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 
या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी कॉलेज ऑफ फार्मसी अकलूजचे प्राचार्य डॉ.  श्री अनिल भानवसे , प्रा. बापूराव अंकलगी , प्रा. महेश मिटकल , प्रा. रविराज जळकोटे, प्रा. स्वप्नील राजेघाटगे  व  प्रा. श्रीमती संजीवनी सावंत व  शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती गिरीजा साळुंखे तसेच राष्ट्रीय सेवा  योजना स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या