Ticker

6/recent/ticker-posts

पुस्तकांची ताकद ओळखा म्हणजे तुमची ताकद वाढेल - - कल्याणराव पाटील


चित्रा न्युज ब्युरो  
लातूर :-आपली संस्कृती कळण्यासाठी व टिकविण्यासाठी वाचन संस्कृती रुजणे आवश्यक आहे. खास करुन विद्यार्थी वर्गाने वाचनाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविले पाहिजे. पुस्तकांची ताकद ओळखा म्हणजे तुमची ताकद वाढेल असे प्रतिपादन लातूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा कॉंग्रेस (आय ) चे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील यांनी केले. 
           छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, हाळी येथे आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर उद्घाकीय भाषणात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यालय, हंडरगुळीचे मुख्याध्यापक आर एम सय्यद, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख रमन माने, ग्राम पंचायत सदस्य गौतम सोनकांबळे, माजी मुख्याध्यापक व्ही व्ही अंचेवाड, ए. एस. मोमीन, छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष काळे, सचिव तथा माजी मुख्याध्यापक ए. के. तेलंगे गौत्तम सोनकांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
               यावेळी पुढे बोलताना कल्याणराव पाटील म्हणाले की, आपला मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढविण्यासाठी नियमित वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तकेच तुम्हाला यशस्वी करु शकतात. माझ्या शालेय जीवनात ययाति हा पहिला ग्रंथ मी वाचला. त्याला ज्ञानपीठ पुरस्कार का मिळाला याची उत्कंठा माझ्या मनात होती. जेव्हा रहस्य कळले तेव्हा मला याचे कौतुक वाटले. तेव्हापासून मला वाचनाची सवय लागली.  आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी वाचन करायला हवे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 
               ए. के. तेलंगे यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करुन ग्रंथ प्रदर्शन आयोजनामागचा हेतू सांगितला. मुख्याध्यापक आर एम सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष काळे व सचिव ए के तेलंगे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या