Ticker

6/recent/ticker-posts

लोकसेवा मंडळ भद्रावती द्वारा संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व लोकमान्य ज्ञानपीठ भद्रावती तर्फे राजू गैनवार पत्रकार व अनेक पत्रकार मान्यवरांचा गौरव सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथील अमृतमहोत्सवी वर्ष तथा स्वर्गीय निळकंठराव गुंडावार जयंती समारोह कार्यक्रम नुकताच लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती च्या विद्यमाने दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
या मध्ये पत्रकारांनी आजपर्यंत कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला इंग्रज्यांच्या काळापासून वृत्तपत्रामध्ये लेखणीची सूर्यासारखी तेज धारेनी दाखवण्याचा प्रयत्न केला पत्रकारचे आराद्यस्तंभ बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांनी जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पत्रकार म्हणजे देशाचा चौथा आधारस्तंभ असलेल्यांची दाखल घेऊन पत्रकार यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आले 
या मध्ये  श्री राजू गैनवार ( पत्रकार ) दैनिक लोकशाही - श्री दिलीप ठेंगे ( पत्रकार ) दैनिक लोकसत्ता - श्री दिलीप मांढरे ( पत्रकार ) दैनिक लोकमत समाचार - श्री विनायक 
येसेकर ( पत्रकार ) दैनिक लोकमत - श्री प्रा पी जे टोंगे ( पत्रकार ) दैनिक देशोउन्नती - श्री  प्राचार्य सचिन सरपटवार ( पत्रकार ) दैनिक लोकमत इत्यादी पत्रकारांचा सन्मान चिन्ह - सम्मान पत्र व तुकडोजी महाराज यांची ग्रामगिता देऊन मोठया उत्साहात थाटामाटात सत्कार समारोह गौरव सोहळा अतिथीच्या हस्ते करण्यात आला 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत गुंडावार अध्यक्ष लोकसेवा मंडळ भद्रावती - श्री अमोल कचोरे ठाणेदार पोलीस स्टेशन भद्रावती - श्री आशुतोष सपकाळ ( बि डी ओ ) सवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती - श्री डॉ प्रकाश 
महाकाळकर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती - श्री उल्हास भास्करवार अध्यक्ष शाळा समिती भद्रावती - श्री अमित गुंडावार संचालक लोकसेवा मंडळ भद्रावती - श्री ठेंगणे सर माजी मुख्याध्यपक भद्रावती - प्राचार्या सौ पूनम ठावरी लोकमान्य ज्ञानपीठ भद्रावती - श्री उमाकांत गुंडावार संचालक लोकसेवा मंडळ भद्रावती इत्यादी अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते 
या दोन दिवसीय कार्यक्रमात उदघाट्न सोहळा - शिवकालीन वस्तू संग्रह प्रदर्शनी - व्याख्यानमाला - एकपात्री प्रयोग - संगीत रजनी - क्रीडा स्पर्धा व सामाजिक कार्यक्रम इत्यादी घेण्यात आले 
या कार्यक्रमाचे संचालन श्री विशाल गावंडे सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री रुपचंद धारणे सर यांनी केले 
या कार्यक्रमात संचालक मंडळ  - विद्यार्थी विद्यार्थिनी - पालक वर्ग आणि स्नेही मंडळी मोठया संख्येने हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या