चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-हिंदवीस्वराज्याचे संस्थापक राजे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.१९ रोजी हाळी-हंडरगुळी गावात मोठ्या उत्सहात व मंगलमय वातावरणात साजरी झाली.
यावेळी सर्वप्रथम हाळी व हंडरगुळी या दोन्ही गावातील शिवरायांच्या पुतळ्याची विधिवत पुजा,अभिषेक व ध्वजा वंदन करण्यात आले.तसेच छञपती शिवाजी महाराज चौक हंडरगुळी येथे जयंती उत्सव समिती तर्फे शालेय विद्यार्थ्यांचा विविध कलागुणांचा कार्यक्रम आयोजित केला होता.यात रामराव पाटील प्रा.शाळा,बाळ राजे इंग्रजी शाळा,सरस्वती इंग्रजी शाळा या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छञपतींच्या जिवनावर भाषण केले. तसेच विविध कलागुणही सादर केले.यावेळी चौकात महाप्रसादाचे आयोजन केले होते. या सर्व कार्याप्रसंगी सर्वधर्मीय युवक, हाळी-हंडरगुळीकर जनता व शिवप्रेमीं युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दि.१९ रोजी हाळी-हंडरगुळीसह परिसरातील सुकणी,नागदरवाडी मोरतळवाडी,चिमाचीवाडी,रुद्रवाडी, आडोळवाडी,आनंदवाडी या गावात छञपती शिवाजी राजे भोसले यांची जयंती मोठ्या जोष पुर्ण व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी परिसर भगवे ध्वज व पताक्यांनी गजबजलेले दिसत होते.यामुळे परिसरात भगवे वादळ अवतरले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही
पोहेकाॅ.संजय दळवे-पाटील, शिवप्रताप रंगवाळ,पोकाॅ.गोरख कसबे,दयानंद सोनकांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 टिप्पण्या