Ticker

6/recent/ticker-posts

लहरी वातावरणामुळे हाळीकरांच्या आरोग्याच्या वाढल्या तक्रारी.!आरोग्य यंञणा सज्ज,डाॅ.काळवणे..

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-मागच्या कांही दिवसापासुन हाळी व परिसरात वातावरणीय बदल मोठ्या प्रमाणात झाला आहे.यात कधी थंडी तर कधी गरमी!असा बदल जाणवत असल्याने लहानग्यांपासुन ते वयस्क मंडळी या लहरी वातावरणामुळे पुर्ण पणे बेजार झाले असुन,अनेकांच्या विविध आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत.परिणामी दवाखाणे रुग्णांनी भरत आहेत.
फेब्रुवारी महिना शेवटच्या टप्यामध्ये आला असलातरीही राञी व पहाटे गारठा व दुपारी उष्णता!असे अजब- गजब बदल वातावरणात जाणवतात व अशा या अजब-गजब वातावरणा- चा अनुभव हाळीहंडरगुळीसह आजु बाजुच्या गावातील जनता घेत आहे. फेब्रुवारी म्हणजे उन्हाळ्याचा पहिला महिना.पण हा महिना संपत आलाय, तरीही उन्हा ऐवजी थंडीचाच जास्त  तडाखा जाणवुलागलाय.आणि हा सगळा निसर्गाचा चमत्कार म्हणावा की ग्लोबल वार्मींगचा.यावर मत- मतांतरे ऐकू येतात.
ऐन फेब्रुवारीत अनेकांना सर्दी,फडसे व खोकला यासारखे आजार होत असल्याचे समजते.
मागच्या कांही दिवसांपासून हाळी व परिसरात दुपारी उन्हाचा तडाखा व राञी,मध्यराञी ते पहाटे पर्यंत गारठा  सहन करावा लागत आहे.तसेच यंदा या भागात थंडीनेही सगळेजण ञस्त झाले होते.अगदी तसेच आताही या भागात कमाल व किमान तापमानात  सातत्याने बदल होत असल्याचे आम जनतेला जाणवत आहे.आणि याच बदलाचा फटका बसलेल्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. 

गत कांही दिवसांपासून वातावरण बदलल्याने तसेच आगामी उन्हाळा पाहता जनतेनी न घाबरता आरोग्याची काळजी घ्यावी.व नजीक असलेल्या दवाखाण्याशी संपर्क साधावा आणि तपासणी करुन घ्यावी.  बदललेल्या वातावरणाशी सामना करण्यासाठी आरोग्य यंञणा सतर्क आहे.
डाॅ.एस.एस.काळवणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या