चित्रा न्युज प्रतिनिधी
कुर्ला - दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका वॉर्ड क्रमांक १५१ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती निमित्त चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक भरपुर मुलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विजेत्या मुलांना पारितोषिक व स्पर्धेत सहभागी मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, महिला ता. संध्या पगारे तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव, तालुका महिला महासचिव मालती वाघ, वॉर्ड अध्यक्ष अनिश वाघमारे व वॉर्ड आणि स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन वॉर्ड उपाध्यक्ष अविनाश येडे आणि कुर्ला तालुका आय टी सचिव अनिल म्हस्के यांनी केले होते. स्थानिक रहिवाश्यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या