Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी - संदिपभाऊ गवई

चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा :-मेहकर येथे तथागगत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई व महिला आघाडी राष्ट्रीय सचिव कांचन मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. गनिमीकावा तंत्राचा वापर करून अनेक गडकिल्ले सर केले. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे पवित्र कार्य केले. रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिल्यामुळे शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून आपले विचार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या