चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-अकलूज येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात *"सृजनरंग महोत्सव २०२५"चे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन युवानेते *चि.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.महाविद्यालयात शिक्षणाबरोबर विद्यार्थीच्या सुप्त कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये बाॅक्स विकेट क्रिकेट स्पर्धा (मुले व मुली), व्हिडिओ रिल मेकींग (तयार करणे) स्पर्धा,मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा,मेहेंदी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा,प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.हा महोत्सव दि.१४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे


0 टिप्पण्या