आरोपीना लवकरात लवकर अटक न झाल्यास नाभिक समाजाच्या वतीने राज्यभरात आदोलन करण्याचा इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : नांदेड जिल्यातील किनवट येथे दिनांक 18 मे 2025 रविवार रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान अतुल हळदकर रा. किनवट जिल्हा नांदेड यांच्या दुकानातील दोन कारागिरावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
आरोपी संदिप जाधव हा सलुनमध्ये दाढी करण्यासाठी आला होता दुसरं ग्राहक असल्यामुळे यांना थोडा वेळ लागल्यामुळे संदिप जाधव यांनी .माझा नंबर का लावीत नाही म्हणून कारागीर यांच्याशी वाद घालत असता यांनी 1)हम्मनलू खासे व 2)राजू सुरजवाड यांच्यावर दुकानातीलच वस्तरा घेऊन प्राणघातक हल्ला केला.
त्या पैकी हम्मनलू दिगंबर खासे ह्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत समस्त समाज बांधव दुकाने बंद करून पोलिस स्टेशन किनवट येथे तळ ठोकून बसले होते.
आरोपी वर गुन्हा दाखल झाला परंतु आरोपी सध्या फरार आहे.
आरोपी संदीप जाधव रा. गंगानगर किनवट येथील असून त्यास तात्काळ अटक करण्यात येईल असे पोलिसांनी आश्वासन दिले. लवकर अटक न झाल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळ द्वारा व महाराष्ट्राती सर्व नाभिक समाज संघटना एकत्र येऊन राज्यभरात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाद्वारे भेट देऊन पोलिसांना सांगण्यात आले.
0 टिप्पण्या