उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :-आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी शहादा येथील कार्यक्रमात जाहीर रित्या आदिवासी संघटनांना "तीनपाट" असा जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी आदिवासींचा जाहीर रित्या अपमान केल्याबद्दल ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा,अशी मागणी बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,सुरेश पवार, सोम पावरा,छोटू पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.विडीओची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दत्ता पवार यांनी दिले आहेत.
आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिनांक १६ मे २०२५ रोजी चंद्रकांत रघुवंशीविरोधात लेखी फिर्याद शहाद्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना दिली आहे.तरी सदर इसमाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला नाही,ही आदिवासींवर अन्यायकारक बाब आहे.१६ मे २०२५ रोजी आम्ही आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता.म्हणून आम्हाला आम्ही आदिवासी आहोत हे माहित असतांना देखील जाणीवपूर्वक जाहीर ठिकाणी आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक अपमानास्पद शब्द प्रयोग केलेला आहे.तक्रार नोंदवून घेत नाहीत, म्हणून पोलीस ठाण्यातच आदिवासी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.ॲस्ट्रासिटीसारखे गंभीर गुन्हे शहादा पोलीस ठाण्यात नोंदवले जात नाहीत, त्यासाठी आदिवासी तक्रारदार यांना नेहमीच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनाच भेटावे लागते.पोलीस निरीक्षक हे पुढा-यांच्या इशाऱ्यावर काम करतात.आमच्या सारख्या संघटना पदाधिकाऱ्यांची तक्रार नोंदवली जात नसेल तर सर्वसामान्य आदिवासी बांधवांची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात नोंदवली जात नाही,असे सिद्ध होते.असा आरोप संघटना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींची लेव्हल लायकी काढली आहे म्हणून आदिवासी समाज याची लेव्हल उतरवल्याशिवाय राहणार नाही.यांना नंदूरबार जिल्ह्य़ातून यांच्या राज्यात हाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत.यांनी आदिवासींना तीनपाट बोलले आहे म्हणून येणा-या काळात चंद्रकांत रघुवंशी व यांच्यासोबत फिरणा-यांचे,यांच्या शिंदेगट पक्षाचे आदिवासी समाज पानीपत केल्याशिवाय राहणार नाही. गुन्हा दाखल न केल्यास आदिवासी संघटनांकडून चंद्रकांत रघुवंशीविरोधात व पोलीस प्रशासन विरोधात संपूर्ण जिल्हा बंद ची हाक देणार आहोत,असा इशारा आदिवासी संघटनांकडून देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या