Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून बुद्ध भीम गीतांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
तुमसर :- तालुक्यातील गरा, बघेडा, येथे बुद्ध जयंती महोत्सव 2025, सम्राट अशोक बुद्ध विहार समिती, नवयुग बुद्ध विहार मंडळ गरा बघेडा, द्वारा आयोजित, दिनांक-12/05/2025 रोज सोमवारला बुद्ध पोर्णिमा निमित्त स्थळ- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्ध विहार परिसर, गरा बघेडा, तालुका तुमसर जिल्हा भंडारा, सायंकाळी 9 वाजता बुद्ध भीम गीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे उद्घाटक - जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले, यांच्या हस्ते पार पडला, प्रमुख पाहुणे - पंचायत समिती सदस्य राजेश ठाकूर, पोलीस पाटील तालीब सिद्दिकी, ग्रामपंचायत सरपंच वसंत तरटे, सिद्धार्थ घोडीचोर, ग्रामपंचायत सदस्य, निलेश जीवतोडे ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते अनिल गौरेकर, कार्यक्रमाचे आयोजक ललित गौरेकर, नरेंद्र लांजेवार, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे शाहीर अरुण मेश्राम, गायिका नीलकमल गोंडाने, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी शाहीर अरुण मेश्राम, गायक रमेश रामटेके, शंकर मोतकार, दिलीप मेश्राम, नाल वादक अखिलेश गेडाम, बॅन्जो मास्तर जहागीर गजभिये, तबला वादक राजू शेंडे, तबलावादक ललित गौरेकर, अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, रक्षा बागडे, लता गौरीकर, भीम शाहीर प्रदीप कडबे, कार्यक्रमाचे आयोजक अनिल गौरेकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित गौरेकर यांनी केले, सम्राट अशोक बुद्ध विहार समिती, नवयुग बुद्ध मंडळ, सुजाता उपासिका मंडळ, समस्त गाव वाशी गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या