चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती - वंचित बहुजन आघाडी भातकुली येथे वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जिल्हा अध्यक्ष संजय चौरपगार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाली. भातकुली तालुका अध्यक्षांना प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुखांशीं संपर्क साधून त्यांची बैठक लावावी. पुढील होणाऱ्या इच्छुक उमेदवारांची नावे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांच्याकडे नोंदवण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली.
पक्षाच्यावतीने अमरावती पश्चिम विभागातील जिल्हा परिषदच्या पूर्ण 33 जागा व पंचायत समितीच्या पूर्ण 66 जागा लढण्याची तयारी करत आहे. भातकुली विश्रामगृह येथे या बैठकीचे आयोजन तालुकाप्रमुख देवानंद इंगळे यांच्यातर्फे करण्यात आले.
या बैठकीला अमरावती जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, जिल्हा महासचिव अशोक नवलकर, आनंदराव इंगळे, दिलीप जवंजाळ, आशिष खंडारे, दुर्योधन लोणारे, मोहम्मद जुबेर, महेंद्र पगारे, वाल्मीक रौराळे, राजेश मकेश्वर, राजू सरदार, भारत राऊत, अमर जवंजाळ बबलू ढोके, दिनेश भाऊ भटकर, भूषण हिवराळे, दशरथ इंगळे, रवींद्र इंगळे, पुणेश्वर रौराळे, आदेश धनदर, राजेश वानखडे, मनोज जामनिक सुभाष धनदर, अतुल थोरात, सुभाष धनदर, महेंद्र गुडधे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या