चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाताने गटार साफ करणे, हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे, आणि वाहून नेणे ही पद्धत बंदी असताना ही प्रथा दिल्ली शहरात राजरोस आजही सुरु असल्याची उघडकीस आले आहे. याबाबतचे वास्तव मांडणारे काही फोटो आणि त्याबाबतचा मजकूर त्यांनी सोशल मीडिया एक्स हॅडलवर शेअर केले आहेत. याबाबत त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय मंत्रालयाला लाज वाटली पाहिजे असे म्हणत जोरदार फटकारले आहे.
प्रकाश आंबेडकर यांंनी सोशल मीडिया हँडल एक्सवर लिहताना म्हटले आहे की, आपल्याकडे चंद्रावर पोहोचून परत येण्याचे तंत्रज्ञान आहे, पण आपला समाज आजही जातीनेग्रस्त असून समाज गटार साफ करण्यासाठी यंत्रे वापरण्यास असमर्थ आहे. तसेच हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे आणि वाहून नेणे या पद्धतींवर बंदी आहे, परंतु ही अमानवी प्रथा अजूनही प्रचलित आहे कारण "जात असते आणि ती जात नाही. तसेच ही अमानवी प्रथा थांबवण्यासाठी किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अजिबात नाही, असे त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला उद्देशून म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून दिल्ली येथील मैला साफ करणार्या कर्मचार्यांचे दुख मांडले आहे. त्यांनी दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभागाला लाज वाटली पाहिजे असे म्हटेले आहे. यामध्ये त्यांनी आपण चंद्रावर पोहचून परत येण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. मात्र अद्याप आपण हातानी गटार साफ करणे, मैला वाहून नेणे, साफ करणे यासारख्या कामे करणार्या लोकांसाठी कोणतेही यंत्र विकसित केले नसल्याचे म्हटले आहे.
यामागे आपल्या देशातील जात वास्तव अधोरेखीत होत असून आपल्याकडील जात वास्तव जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ही अमानवी प्रथा बंद करण्याची व या कर्मचार्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राजकारणी लोकांची इच्छाशक्ती अजिबात नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या राजकीय लोकांना याबाबत लाज वाटली पाहिजे असेही सुनावले आहे.
------
0 टिप्पण्या