चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली, :भाजपच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रा. रमेश बारसागडे यांची नियुक्ती झाली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मा.खा.तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी चामोर्शी येथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत म्हटले की, "रमेश बारसागडे यांचे संघटन कौशल्य जिल्हा भाजपला नवे बळ देईल."
या वेळी बाबुराव कोहळे, रेखा डोळस, प्रकाश गेडाम, पुष्पा करकाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या