Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची भंडारा जिल्हा व शहर कार्यकारीणी२०२५_२०२८ करिता गठित


चित्रा न्युज प्रतिनिधी 

भंडारा:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडारा जिल्हा आणि भंडारा नगर यांची नवीन संयुक्त कार्यकारिणी ची सन २०२५_२०२८ वर्षांकरिता  पुनर्रचना पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री मा.नितीनजी काकडे यांचे प्रमुख उपस्थितीत आणि विदर्भ प्रांत अध्यक्ष मा. डॉ नारायण जी मेहरे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर करण्यात आली.श्री सिध्द चिंतामणी गणेश मंदिर खात रोड भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात प्रथम मान्यवर पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येवून  पुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक रवींद्र तायडे यांनी केले.मंचावर नितीन काकडे,नारायण मेहरे,जिल्हा अध्यक्ष प्रेमराज मोहोकार,संघटन मंत्री जयंत सब्जीवाले,अतुल दिवाकर,नगर अध्यक्ष रविंद्र तायड़े,पर्यावरण प्रमुख संजय आयलवार,जिल्हा सचिव अनिल शेंडे ई मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन प्रा डॉ सौ जयश्री सातोकर यांनी केले तर आभार डॉ अनिता जायस्वाल यांनी मानले.नवीन कार्यकारिणी ची घोषणा डॉ नारायण जी मेहरे यांनी केली.नवीन कार्यकारिणी मध्ये नवीन सभासद व सदस्यांची दायित्व यादी या प्रमाणे आहे_*जिल्हा कार्यकारिणी*मध्ये
मार्गदर्शक_१)प्रा. प्रेमराज मोहोकार,
२)जिल्हा अध्यक्ष_जयंत सब्जीवाले
३)जिल्हा उपाध्यक्ष_भुवनेश्वर शिवणकर
४)जिल्हा उपाध्यक्ष_प्रकाश कुरोडे 
५)जिल्हा सचिव _अनिल शेंडे 
६) जिल्हा सह_सचिव _प्रा.सौ. डॉ.जयश्री सातोकर
७)जिल्हा सह_सचिव_राजेश पांडे
८)जिल्हा कोषाध्यक्ष_कृष्णा खेडीकर
९) जिल्हा महिला प्रमुख_सौ दीप्ती कुरोडे,
१०) जिल्हा प्रचार_ प्रसिध्दी आयाम_मो. सईद शेख 
११)जिल्हा पर्यावरण प्रमुख_प्रमोद सेलोकर
१२)जिल्हा रोजगार सृजन प्रमुख_रवी खोडे
१३)जिल्हा आय टी सेल प्रमुख_रमेश पारधी
१४)ग्राहक मार्गदर्शन केंद्र कार्यालय_उमराव हटवार
१५)विधी सल्लागार_राहुल देवगडे
*भंडारा नगर कार्यकारिणी* मध्ये_
१) नगर अध्यक्ष _रवींद्र तायडे 
२)नगर उपाध्यक्ष_सौ.उषा मोहोकार,
३)नगर उपाध्यक्ष_सौ.प्रभा ढोके 
४)नगर सचिव_ लोकेश मोहबंसी
५)नगर_सह सचिव_अतुल वर्मा 
६)नगर महिला प्रमुख_प्रा. डॉ. सौ.अनिता जयस्वाल
७)नगर कोषाध्यक्ष_ नितीन रासेगावकर
*कार्यकारीणी सदस्या* मध्ये वामनराव गोंधुळे,प्रमोद चांदे, किशन शेंडे,श्यामला ताम्हणे,विष्णुपंत पंडे,रवी नायगावकर,कल्पना पनके,शिल्पा उमाळकर,अनिल नागपूरकर,सुरेश वंजारी,विजय क्षीरसागर ई चा समावेश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या