Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी आठवले च्या वतीने भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 कोल्हापूर :-काश्मीर येथील पैलगाम या पर्यटन स्थळावर निष्पाप 28 भारतीयांची हत्या करणाऱ्या पाकपुरस्कृत अतिरेकी टोळ्या व त्यांच्या नऊ अड्ड्यावर अचूक आणि भेदक हल्ला करणाऱ्या भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले यांनी जाहीर केलेल्या भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप आज कोल्हापूर येथे संपन्न झाला दसरा चौक येथून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली सीपीआर चौक,गंगाराम कांबळे स्मारक, महानगरपालिका,छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भवानी मंडप मार्गे ऐतिहासिक बिंदू चौकात भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप करण्यात आला क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांती स्तंभाला अभिवादन करून समारोप सभेला सुरुवात झाली स्वागत आणि प्रस्ताविक निमंत्रक तसेच या रॅलीचे संयोजक रिपब्लिकन पक्षाचे  जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी केले सभेला मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव प्रा शहाजी कांबळे म्हणाली की भारत देशावर वारंवार होणाऱ्या अतिरेकी हल्ले पाकिस्तान लष्कर पुरस्कृत आहेत या अतिरेक्यांचा उपद्रव जगाची शांती बिघडवणारा आहे या अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने अत्यंत कौतुकास्पद आणि प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावे अशी कामगिरी केली संपूर्ण लष्कराचा या शौर्याला ताकद देणे गरजेचे आहे*
 *महाराष्ट्र राज्य सचिव बी. के. कांबळे म्हणाले की रिपब्लिकन पक्षाने नेहमीच राष्ट्रीय हिताची आणि अभिमानाची कामे केलेली आहेत देशाच्या लष्कराने केलेल्या कामगिरीला अभिनंदन करून कौतुक करण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी जाहीर केलेली भारत जिंदाबाद यात्रा आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे,कबीर नाईकनवरे, चरणदास कांबळे,किरण नामे,नामदेव कांबळे,कुंडलिक कांबळे,सलमान मौलवी यांची भाषणे झाली जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांनी या समारोप सभेचे आभार मानले यावेळी होलार आघाडीचे  लक्ष्मण पारसे,शाम लाखे,ज्येष्ठ नेते राजू भडंगे,दिलीप कोथळीकर,सुरेश शिरोलीकर,सरदार कांबळेशाहूवाडीकर,सुनील कांबळे,सुहास हुपरीकर,शिरीष थोरात,खंडेराव कुरणे,रोहित कांबळे,तुषार नाईकनवरे,राहुल गलगले,गणेश भोसले,सागर भोसले,आकाश पवार,बाबासो कांबळे,संदीप कांबळे,सुरज तांमगावकर,अमोल गवळी,अनिल नलावडे,रवी शिवशरण,रुपेश आठवले,सरदार आमशीकर यांच्यासह 400 ते 500 रिपब्लिकन सैनिक या समारोप रॅलीमध्ये सहभागी झाले होते “नाद नाही करायचा…भारताचा… “या घोषणांनी तसेच  पोक भारताच्या ताब्यात घ्यावा भारत जिंदाबाद भारतीय सैन्य दलाचा विजय असो रिपब्लिकन पार्टीचा विजय असो आठवले साहेब आगे बढो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या