Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीकडून माजी जिल्हाध्यक्षांचा गौरव!


सामाजिक योगदानाची जाणीव जपणारा सोहळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ : गेली चार दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अविरत योगदान देणाऱ्या भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडीच्या सर्व माजी जिल्हाध्यक्षांचा सत्कार सोहळा नुकताच शहरातील सेलिब्रेशन हॉलमध्ये पार पडला. 

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात गौरवाचे क्षण अनुभवायला मिळाले.

कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत नेते डी.जे. आनंद, नानाजी शिरसाट, पांडुरंग मेश्राम, शशिकलाताई भवरे व कैलास धोटे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर त्यांचे नातेवाईक नरेंद्र आनंद, पुष्पा शिरसाट, श्री. भवरे, सौ. मेश्राम यांनी सत्कार स्वीकारले. त्याचप्रमाणे ऍड. आनंद गायकवाड, रणधीर खोब्रागडे, खंडेश्वर कांबळे, उत्तमराव पांडे, विजय लहाने, शीतल सिरसाट, धनंजय गायकवाड, धम्मवती वासनिक यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

या सत्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि ज्यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य घालवलं, त्यांच्या कार्याची दखल घेण्याची परंपरा सुरू राहील, अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे उपस्थित होते. त्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत असे गौरव सोहळे संपूर्ण राज्यात घेण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला.

या कार्यक्रमाचे संचालन शिवदास कांबळे यांनी केले. तर आभार सुकेशनी खोब्रागडे यांनी मानले. यावेळी डी. के. दामोदर, मिलिंद पाटील, मंगल तेलंग, विशाल पोळे, गजानन सावळे, संघपाल कांबळे, बुद्धरत्न भालेराव, बिशर हाफिज, मधुकर कांबळे, लोकेश दिवे, दीपक नगराळे, सिद्धार्थ भवरे, राजकुमार उमरे, केशव भागवत, ज्ञानेश्वर महेशकर, प्रणिता ठमके, संजय मुजमुले, सुरज भितकर, प्रेमदास रामटेके, नंदिनी ठमके, वैशाली गायकवाड, शारदा मेश्राम, अरविंद दिवे, अर्चना नगराळे, मीना रणीत, करुणा मून, भारती सावते, रत्नमाला कांबळे, सविता तिडके, संगीता भवरे, संध्या काळे, निशा निमकर, कल्पना सिरसाट, प्रमोद पाटील, प्रसेनजित भवरे, विलास वाघमारे, गजानन कोकाटे, गोलू सिरसाट, गुणवंत मानकर, विश्वास पाटील, शैलेश भानवे, प्रा. अमित भगत, आनंद भगत, अॅड. चंदू भगत, भारत कुमरे, सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या