चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य कडून दि.१० जुन २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार पुरस्कार्थी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन.देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवर ना. एकनाथजी शिंदे-उपमुख्यमंत्री , संजयजी सिरसाट, सामाजिक न्यायमंत्री, अरविंद सावंत लोकसभा सदस्य, हर्षदीप कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग यांच्या उपस्थितीत पार पडला.
सदर पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्था यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील एकमेव पुरस्कार्थी इंजि. रूपचंद रामटेके , सामाजिक कार्यकर्ते यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 2023 - 24" पुरस्काराने माननीय नामदार संजयजी शिरसाट, समाज कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कृत करून सन्मानित करण्यात आले.
या अगोदर इंजी. रुपचंद रामटेके यांच्या कार्याची दखल घेऊन विविध संस्थेने, विहाराने तसेच सामाजिक संघटनांनी पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
श्री. रुपचंद रामटेके यांच्या भरिव कार्याची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाने "डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले असल्याने शासनाप्रती आभार व्यक्त करण्यात येत असुन तसेच इंजि.रुपचंद रामटेके यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस ,विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा चे संपादक व जनता टाईम जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून भंडारा जिल्ह्यातील गणमान्य व्यक्तींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या