चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्यावतीने वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय टॉवर चौक अकोला येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव नागे यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी अहिल्यादेवी यांचे कार्य घरोघरी पोचले पाहिजे असे विचार मांडले, तर सर्व कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवी चे कार्य घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प केला.
यावेळी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वसंतराव नागे गजानन गवई, किशोर जामणीक सिंहासन जाधव , डॉ अशोक मेश्राम गोपाल चव्हाण, सतीश चोपडे, नितीन सपकाळ, पराग गवई, विकास सदाशिव, संजय नाईक, संतोष कीर्तक, प्रदीप पळसपगार प्रदीप, संजय कीर्तक , राजू मुधवणे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या