Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या व्यापारावर गदा : वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर : महाराष्ट्र गोसेवा आयोगाने २९ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, जिल्हा लातूर यांच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. या परिपत्रकानुसार बकरी ईद यांसारख्या मुस्लिम धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी जनावरांची बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पत्रकामुळे गोवंश नसलेले प्राणी विकण्यावर बंदी येणार आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, माल वाहतूकदार यासारख्या अनेकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.  

वंचित बहुजन आघाडीने या निर्णयाचा विरोध करते. शेतकऱ्यांच्या व्यापारावर अन्यायकारक अडथळा ठरणारा हा प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर विशेष कक्ष अधिकारी (DSB) बावकर यांच्यामार्फत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रशासनास विनंती केली आहे की, धार्मिक सणांच्या दिवशी शांतता व सुव्यवस्था राखत बाजारपेठा सुरळीत चालू ठेवाव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान टळेल आणि कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत.

यावेळी जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम, महासचिव रोहित सोमवंशी, प्रा. प्रशांत उघाडे, सचिन गायकवाड, आकाश इंगळे, सुरेश सूर्यवंशी, राहुल सोनवणे, कामगार युनियन अध्यक्ष अमोल बनसोडे, शरीफ पठाण, सुनील कांबळे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या