Ticker

6/recent/ticker-posts

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – प्रकाश आंबेडकर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
बोधगया, बिहार :  काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराला भेट दिली. राहुल गांधींच्या महाबोधी मंदिर भेटीवरून आता वाद सुरु झाले आहेत. राहुल गांधी तिथे गेल्यानंतर "महाबोधी मुक्ति आंदोलन" संदर्भात एकही शब्द न बोलल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. 

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी काय तिथे फक्त पर्यटनासाठी गेले होते का?" बौद्ध धम्माच्या पवित्र स्थळी जाऊनदेखील त्यांनी तेथील महाबोधी मुक्ती आंदोलना संदर्भात काहीही भाष्य केले नाही. कदाचित त्यांची इच्छा नसावी, फक्त फोटो काढण्याची त्यांची इच्छा असावी, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

या सर्व आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासून लढतेय आणि लढत राहणार असं त्यांनी म्हटले आहे.

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे हस्तांतर करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून तेथे आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाबाबत राहुल गांधी यांनी एकही शब्द  बोलले नाहीत तसेच त्यांनी या आंदोलकांची भेट घेणे सुध्दा त्यांनी टाळले. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर टिका करण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या