Ticker

6/recent/ticker-posts

महिलेला भर रस्त्यावर मारणाऱ्या नराधमावर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीचे SP ना निवेदन!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :  उंबरे ता. माळशिरस येथे अत्यंत निंदनीय घटना घडली आहे. २८ मे रोजी गावातील एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्यावर नकार देणाऱ्या महिलेला आरोपी गावगुंड हरिदास रघुनाथ भोसले याने  रस्त्यावर लाठीकाठीने बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

आरोपी हरिहास रघुनाथ भोसले याला त्वरीत अटक करून कायदेशीर कारवाई करावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले. 
आरोपीला लवकरात लवकर अटक केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा सुद्धा पोलिसांना देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे , विक्रांत गायकवाड, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या