चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी -वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि चाकुर तालुक्यात असलेल्या मौजे.राचन्नावाडी येथील शेतकरी भानुदास कोडींबा वागलगावे यांच्या गट.क्र. १८/०५ मध्ये असलेल्या शेत जमिनीतील विहीरीत 5 एच.पी.पान बुडी मोटार २७ जुलैच्या स.७ ते रा. ९-३० वा.दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद भानुदास वागलगावे यांनी दिलेवरुन सदर गुन्ह्याचा तपास करणारे जमादार एस.पी.दळवे-पाटील यांनी वरिष्ठ अधिका-यांना गुन्ह्याची माहिती देत अज्ञात आरोपींच्या तपासकामी एक पथक तयार करुन राञ गस्तीला असलेले पोउपनि.टोपाजी कोरके, स.फौ. अंतराम केंद्रे,टी.टी.बळदे, संजय कलकत्ते यांनी सदर गुन्ह्याचा, आरोपींचा शोध घेण्यास सांगितलेने वरील अधिकारी,कर्मचारी यांच्यासह गस्त वाढवून गुप्त माहिती मिळताच सदर गुन्हा घडल्याच्या अवघ्या दोन तासात आरोपी नामे विठ्ठल विश्वनाथ कोरे (वय.३५) व दत्ता मोतीराम नंद गावे (वय.४५) रा.राचन्नावाडी ता. चाकुर यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
या गुन्ह्यात वापरलेली दोनचाकी वाहन बजाज डिस्कव्हर एमएच.२४- डब्लू-७६७१ ही गाडी फरार आरोपी तुकाराम ईश्वर आवाळे राचन्नावाडी याने लातुरातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तसेच सदर वाहन चोरीबाबत एमआयडीसी ठाणे लातूर येथे गुरजिनं.६१२/०२५ कलम.३०३ (२) भान्यासं.या नुसार गुन्हा दाखल आहे.तसेच भानुदास वागलगावे याने दिलेल्या फिर्यादीवरुन वाढवणा पो. ठाण्यात गुरजिनं.२१४/०२५ कलम ३०३ (२) ३(५) भान्यासं.नुसार गुन्हा करुन दोन आरोपीसह ६५,००० ह.रु चा मुद्येमाल ताब्यात घेतला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे,उपाधिक्षक मंगेश चव्हान,उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.सुनिल पी. गायकवाड,पोउपनि.टोपाजी कोरके, सहा.फौजदार अंतराम केंद्रे,पो.हे.काॅ एस.पी.दळवे-पाटील,टी.टी.बळदे,पोना.संजय कलकत्ते यांनी करुन दोन आरोपींसह ६५,००० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
अधिक तपास दळवे-पाटील करतात
0 टिप्पण्या