चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-दि.८,९ व १२ जुन पासून गायब झालेल्या पावसाने दि.२ जुलै रोजी जबरदस्त पुनरागमन केले.एक तास पडलेल्या जोरदार पावसामुळे पेरणी केलेले तसेच न केलेलेही शेतकरी सुखावले आहेत.पाणसाळ नसल्या- मुळे हंडरगुळीच्या ग्रा.पं.समोरील मैदानाला मिनी जलतरण तलावाचे स्वरुप आले होते.
एकंदरीत आजचा हा पाऊस कडक ऊन्हात व सोसाट्याच्या वा-यात वाया जाण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांसाठी टाॅनिक ठरला असल्याने पेरणी केलेले आनंदी दिसतात.तसेच मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आजवर पेरणी न केलेले शेतकरी आज दि.२ जुलै रोजी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे पेरणीसाठी चांगले झाले. म्हणुन समाधानी दिसतात.
तसेच आजच्या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे ना विजांचा कडकडाट , ना ढगांचा गडगडाट.एकदम शांततेत पण जोरदार पडला.यामुळे शेतकरी व सामान्य गावकरी सुखावले आहेत गावची संसद असलेल्या ग्रा.पं.पुढील मैदानावर पाणीच पाणी साचल्याने मैदानाला मिनी जलतरण तलावाचे स्वरुप आले होते.
0 टिप्पण्या