चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :-माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उदगीर तालुकाध्यक्षा उर्मिलाताई संजय वाघमारे यांच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळा निडेबन, अंगणवाडी क्रमांक १,२,३,४ निडेबन सह जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा शेल्लाळ व निडेबन शाळेत विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन, आदी शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य प्रा.डॉ. श्याम भाऊ डावळे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाॅं, कल्लूरचे युवा सरपंच लक्ष्मण कुंडगीर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उदगीर तालुकाध्यक्षा उर्मिलाताई संजय वाघमारे, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टी, माजी नगरसेवक राजकुमार चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफी हाश्मी, मायाताई कांबळे, ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे अतनूरकर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी चे राज्य समन्वयक एस.जी. शिंदे, दलित मित्र बी.जी.शिंदे, शेल्लाळ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वामी ए.के., श्रीमती केंद्रे एम. के., श्रीमती जांभळे एस.डी., श्रीमती घाडगे पी.टी., श्रीमती काळे ए.एस.,श्रीमती पांचाळ के.एन., पेठे पी.व्ही. प्रहार संघटनेचे उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष सूर्यभान चिखले, नरसिंग चिखले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निडबनचे मुख्याध्यापक विवेकानंद वाघमारे, सहशिक्षक पी.के.केंद्रे, श्रीमती जे.एम.चोले, भोसले मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत सोमवंशी, शिक्षणप्रेमी राजेश अनंतवाळ, अंगणवाडी कार्यकर्ते चंचला हुगे, भुरेवार, कांबळे, गायकवाड, राष्ट्रवादीेचे सलीम शेख, अजम पटेल, सांगावे मामा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दलित मित्र बाळासाहेब गोविंदराव शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रहार संघटनेचे उदगीर-जळकोट विधानसभा अध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष सूर्यभान चिखले व सहशिक्षक पी.के.केंद्रे यांनी मांनले.
0 टिप्पण्या