चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर:- तालुक्यातील हंडरगुळी या गावात गत साडे ४ वर्षापासून गल्ली तेथे विकास कामे हे अभियान सुरु आहे.म्हणुन आजघडीला गावभर रस्ते,नाली,पाणी अशा प्रकारच्या मुलभुत-पायाभुत सेवा,सुविधा देऊन गल्लोगल्ली विकास कामाची बुलेट ट्रेन पळविणा-या व गल्ली तेथे रस्ता, वीजपाणी याची सोय केलेल्या ग्रा.पं. च्या पुढारी मंडळींनी ग्रामपंचायतच्या असलेल्या काॅम्पलेक्स मधील दुरावस्थेकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे.
कारण,तत्कालीन सत्ताधा-यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंञणेचे {D.V.F} १ कोटीच्या घेतलेल्या कर्जातुन बांधलेले ३४ दुकाणे आणि विद्यमानसत्ताधारी मंडळींनी ग्रा.पं. स्वनिधीतून बांधलेले २२ दुकाणे आहेत.आणि सर्व ५६ गाळे रितसर वाटप झाले असलेतरीही ३४ पैकी फक्त २ गाळे व्यापारी वापरतात. तर ३२ गाळे सताड बंदच असतात. म्हणुन या ठिकाणी ट्रॅक्टर, टेंम्पो,या सारखी वाहने तेथे राञंदिवस थांबुन असतात.आणि त्यातील कांही वाहनधारक वाहन साफ करत असताना टेंम्पो,ट्रॅक्टर मधील कचरा काॅम्पलेक्सच्या आवारातच टाकतात आणि वारे सुटताच तो कचरा आत असलेल्या मेडीकल स्टोर्स मध्ये व पुढे पडतो.तसेच राञंदिवस कांही खाजगी वाहनचालकांचा तसेच अन्य गावातील कांही दारुड्यांचा येथे दारु पिऊन गोंधळ सुरु असतो.
तसेच कांही महिण्यापुर्वी उद्घाटन केलेल्या २२ पैकी बहूतांश दुकाणात विविध धंदे थाटले आहेत.माञ याच दुकाणांना लागुन असलेल्या जागेत कांही वाहनचालक व दारुडे माणसं लघूशंका करत असल्याने याचा वास सर्वदुर पसरत असल्याने हजारो रु. भाडे देऊन व्यवसाय करणा-यांना वरील सर्व गोष्टींचा हकनाक ञास सहन करावा लागतोय.तेंव्हा गल्ली तेथे विकास कामाची बुलेट ट्रेन सुरु केलेल्या ग्रा.पं.ने या २ काॅम्पलेक्स मध्ये निर्माण केलेल्या समस्या,दुर्घंधी यांची सोडवणुक करणे गरजेचे आहे
ग्रा.पं.काॅम्पलेक्स मध्ये, सार्वजनिक ठिकाणी दारुपिणे कायद्याने गुन्हा आहे.म्हणुन यापुढे वाॅच ठेवुन दारु पिणा-यांना कॅच करण्यात येईल.
टी.कोरके,पोलिस उप. निरिक्षक,वाढवणा बु.
पब्लिक प्लेस,मंदीर परिसरात दारु पिणा-यांना लवकरच कायद्याचा 'प्रसाद' देण्यात येणार आहे.
एस.पी.दळवे-पाटील,बीट जमादार
३४ पैकी एका गाळ्यात मेडीकल आहे.पण कांही वाहनधारक येथे वाहनातील केर,कचरा टाकतात.व तो उडून सर्वञ पसरतो.
किशोर काळवणे,व्यावसायीक
आठवड्यातून २ वेळा बाजारपेठेत कर्मचारी झाडलोट करतात.पण येथे १ वेळेसही करत नाहीत.तेंव्हा येथेही झाडलोट करावे.
विष्णु तात्या धुप्पे,नागरीक हंडरगुळी
संबंधित महिला कर्मचा-यांना सांगुन झाडलोट करवुन घेऊ.तसेच तेथे दारु पिणा-यांची संबंधितांकडे तक्रार करण्यात येईल.
एस.आर.कांबळे,ग्रामपंचायत अधिकारी,हंडरगुळी
ग्रा.पं.निधितुन बांधलेल्या २२ दुकाण दारासाठी वर ये-जि करण्यासाठी ज्या पाय-या आहेत.तेथे काटेरी कुंपन बसविण्यात येईल.
विजय अंबेकर,सरपंच,हंडरगुळी
0 टिप्पण्या