चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-दि.२१ जुलैच्या मध्यराञी तासभर पडलेला दमदार पाऊस.तसेच दि. २३,२४ व २५ जुलै रोजी अधूनमधून पडलेल्या रिमझिम पावसामुळे हाळी हंडरगुळी परिसरातील पीके बहरली असल्याने तसेच २१ रोजी पडलेल्या पावसाने जमीनीत चांगली ओल झाली आहे.आणि सलग ४ दिवसा पासून रिमझिम पाऊस पडत आहे. म्हणुन ओलीवर ओल गेलीय खोल यामुळे बळीराजा समाधानी दिसत आहे.तसेच सतत पडणा-या पावसा मुळे जनजिवन विस्कळीत झालेआहे गत कांही दिवसापासून राञंदिवस आकाशात काळेढग यायचे.पण पाऊस यायचा नाही.आणि ऊन माञ कडकडीत पडत होते.म्हणुन खरीप वाया गेला असे वाटायचे. परंतू २१ जुलै पासून सतत रिमझिम पाऊस पडत असल्याने सुकलेली पीके आणी शेतक-यांचे चेहरे चांगले तरारलेली दिसत आहेत.
सध्या रिमझिम पाऊस पडत आहे आणि ओलीवर ओल होत आहे. व हा पाऊस पिकांसह हिरव्या चा-या साठी उपयोगी असलातरीही येथील नदी,नाले,ओढे,तलाव आदी कोरडेच दिसतात.म्हणुन आता धुवाॅंधार पावसाची गरज आहे.
पावसाअभावी खरीप पीकांसह आपली पत ही वाया गेली ! अशी भीती वाटत होती.पण गत २१ जुलै पासून पडत असलेल्या पावसामुळे पीकांना जीवदान मिळाले आणि शेतकरीबांधवांना माणसात बसवले.
माधव अंबेकर,शेतकरी,हंडरगुळी.
आमची पेरणी दुस-या टप्यात झाली आणि नंतर १ दोनदा झालेल्या हलक्याशा पावसावर पीके बहरली होती.पण नंतर पाऊस गायब झाला आणि कडक ऊन पडू लागल्यामुळे पीके सुकून वाया गेल्यात जमा होती परंतू,गत चार दिवसापासून रिमझिम पडणारा पाऊस पीकांना नवजीवन देणारा ठरला आहे.आता मुसळधार पावसाची गरज आहे.कारण,येथील नदी,नाले,डबके,तलाव कोरडेठाक आहेत.ते भरण्यासाठी मुसळधार पाऊस पडावा.
भैय्या संभाजी माने
शेतकरी,हंडरगुळी
0 टिप्पण्या