चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-दि.२१ ते २२ जुलैच्या मध्यराञी ३ वा.दरम्यान मुसळधार पाऊस झाला. व या पावसामुळे कहीं खुशी,कहीं गम , असे वातावरण हाळी तालुका उदगीर या गावात निर्माण झाले आहे याचे कारण म्हणजे हाळी गावातील बौध्दवाड्यातील बहूतांश गटारी सदा सर्वदा घाण पाण्याने तुंबूनच राहत असल्याने याचा फटका असंख्य गरीबांना बसत आहे.त्यातच दि.२१ व २२ जुलै रोजी मध्यराञी अचानक विजांचा कडकडाट व ढगांचा गड गडाटात मुसळधार पडलेल्या पावसा मुळे अगोदरच तुंबलेल्या गटारी ओव्हर फ्लो झाल्या आणि त्यातील वासघाण पाणी अनेक गरीबांच्या घरात शिरल्याने घरभर दुर्घंधी , वास पसरला आणि घरोघरी एकच धावा धाव उडाली.त्यातच बच्चेकंपनी झोपमोड होऊन रडारड सुरु झाली. तर महिलाभगीणींना घरात शिरलेले घाण पाणी घराबाहेर काढताना राञ कधी संपली हे कळलेच नाही.म्हणुन या पावसामुळे गटारीचे घाण पाणी शिरलेल्या घरामध्ये गम तर २० / २५ दिवसानंतर पाऊस पडल्याने हाळी व परिसरातील शेतक-यांमध्ये खुशी असे वातावरण निर्माण झाले आहे. या गावात तुंबलेल्या गटारीमुळे सर्व गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.तसेच ग्रा.पं.तर्फे गटारी साफसफाईची मोहिम राबवावी, अन्यथा गटारातील घाण ग्रा.पं.च्या दारात आणुन टाकण्याच्या तयारीत महिला भगीणींसह सुज्ञ नागरिक आहेत.अशी माहिती विशाल मसुरे, अजय शिंदे,अमर मसुरे,विजय मसुरे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या