Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या महादेव मंदीरात जमला शिवभक्तांचा मेळा..


मंदीर परिसरात बेल,फुल व श्रीफळ विक्री स्टाॅल्स

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यातील तिरु नदी किनारी वसलेले व प्रसिध्द गाव असलेल्या हंडरगुळी येथे श्रावण सोमवार निमित्ताने हजारो भाविक भक्तांनी पहाटेपासून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
हिंन्दु धर्मसंस्क्रतीत श्रावण महिण्याला अन्नन्यसाधारण असे म्हत्व आहे.या महिण्यात येणा-या सोमवारांचे म्हत्व पविञ मानले जाते.या महिण्यात शिवभक्त विशेषत: महिला-भगीनीं शिवआराधना,उपवास करतात.तसेच याच महिण्यात एक बेलपञ अर्पण केल्यास कोट्यावधी यज्ञासमान पुण्य फळ मिळते.अशी अख्याईका आहे.
हा महिना धार्मिक उत्सव,निर्सग पूजन आणि आत्मिक शुध्दिकरण यांचा सुंदर असा संगम आहे.तसेच याच महिण्यापासून नागपंचमी, गौरी,गणपती,रक्षाबंधन आदी सण,उत्सवांना प्रारंभ होतो.तसेच हिरवाशालु नेसुनी काळीआई सजते.म्हणुनच तर श्रावण मासी.. हर्ष मानसी... हिरवळ दाटी चोहिकडे.. असे म्हटले जाते.       अशा प्रकारे श्रावण महिण्याचे हिंन्दुधर्मियांत म्हत्व आहे.तसेच उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावातील जाग्रत तसेच ग्रादैवत असलेले महादेव मंदीराला पण परिसरातील शिवभक्तांत विशेषत: महिलाभगीनींमध्ये सर्वाधिक म्हत्व आहे.
कारण,वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्र यांनी येथील तिरु नदीपाञात स्नान करुन नदीतील रेतीच्या साह्याने पिंड तयार करुन तिचे दर्शन घेतले होते.व तिच पिंड मंदीराच्या गाभा-यामध्ये आहे.हे विशेष....!
पहिल्या श्रावण सोमवारी हंडरगुळीतल्या शिवालयात शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती.मंदीरापुढे बेल,फुलं व श्रीफळ विक्री स्टाॅल लावण्यात आले होते.तसेच मंदीरावर व आत मध्ये आकर्षक सजावट करण्यात आले.तसेच १५ आॅगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणानिमित्य तिरंगा ध्वजाच्या रंगाने पिंडीची सजावट करतात.
भक्त मंडळींसाठी बालाजी वसंतराव सुर्यवंशी व किशन मद्रेवार यांनी मसाला दुध वाटप केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या