Ticker

6/recent/ticker-posts

हिरापूरमध्ये विहिरीत उकळत्या पाण्यासारखे अदभुत दृश्य – ग्रामस्थांत खळबळ


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हिरापूर (ता. गोरेगांव) – गावातील जुन्या विहिरीत  घडलेल्या अनोख्या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये चर्चेची लाट उसळली आहे. विहिरीत पाणी जणू उकळत असल्याप्रमाणे सतत खळखळाट सुरू होता, बुळबुळे वर येत होते आणि पाणी हलत होते. हा प्रकार पाहून ग्रामस्थ अचंबित झाले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सहा महिन्यांपूर्वी याच विहिरीत असाच प्रकार घडला होता. एवढेच नाही तर दुसऱ्या वेळी तर विहिरीत स्फोटसुद्धा झाल्याचे दिसुन आले.
 आता पुन्हा तिसऱ्यांदा पाणी उकळल्यासारखे दिसत असल्याने शंका अधिक गडद झाली आहे.

अंदाजे प्राथमिक माहितीनुसार, अशा घटना भूगर्भातील गॅस साचल्यामुळे, जमिनीखालील तापमानातील बदलामुळे किंवा भूकंपाच्या सूक्ष्म हालचालींमुळे घडतात. त्यामुळे पाण्याच्या तळाशी बुडबुडे तयार होतात आणि पाणी उकळल्यासारखे दिसते.

दरम्यान, काही ग्रामस्थांनी या घटनेला अपशकुन मानत भीती व्यक्त केली आहे, तर काहींनी हे नैसर्गिक कारण असल्याचे सांगून ग्रामस्थांना धीर दिला. मात्र, प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहून भूजल विभागामार्फत तातडीने तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या