Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी येथे भक्तांसह वरुनराजाने केले श्रीं चे स्वागत


 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-ज्या उत्सवाची गेले वर्षभरापासून बच्चेकंपनीसह जेष्ठ मंडळी वाट बघत होती.तो उत्सव म्हणजे गणेश उत्सव.आणि या उत्सवाला मंगलमय वातावरणात दि.२७ रोजी शुभारंभ झाला असून भक्तांसह वरुणराजाने पण हजेरी लावत श्रीं चे सर्वञ जोरदार व जल्लोषात स्वागत केले.
दि.२७ रोजी घरोघरी व सार्वजनिक उत्सव मंडळांनी मोठ्या भक्तीमय वातावरणात तसेच गणपती बाप्पा मोरया च्या गजरात श्री ची स्थापना केली.
यावेळी कांही मंडळांनी  डी.जे.डाॅल्बी ऐवजी पारंपारिक ढोल,ताशा,हलगीचा वापर करुन प्रशासनाचा आदेश पाळला.तर कांही मंडळांनी डी.जे.च्या दणदणाटात मिरवणुक काढली आणि प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवले.सायं.५ वा.राज्यमार्गावरुन सर्व मंडाळानी ट्रॅक्टर मधून  अत्यंत शिस्तीत मिरवणुक काढली आणि श्री ची प्राणप्रतिष्ठापणा केली.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा तसेच गच्चीवर व दारापुढे थांबुन हजारो जनतेनी या सोहळ्याचा आनंद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या