चित्रा न्युज प्रतिनिधी
वडसा (ता. देसाईगंज): -महाराष्ट्रभर ज्येष्ठ गौरी / महालक्ष्मी पूजेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात घराघरांत देवी गौरीचे आगमन, पूजन आणि विसर्जनाचा सोहळा पार पडतो.
भाद्रपद शुक्ल अष्टमीपासून सुरू होणारा हा सण नवविवाहितांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार गौरी म्हणजे पार्वती माता, भगवान शंकरांची पत्नी आणि गणपती बाप्पांची जननी.
कथेनुसार, या दिवशी पार्वती मातेनं राक्षसांचा वध करून स्त्रियांचे रक्षण केले होते. त्या दिवसापासून महिलांनी या दिवशी व्रत व पूजा करण्याची परंपरा सुरू केली.
महालक्ष्मी पूजेच्या निमित्ताने पुरणपोळी, खीर, वरण-भात, पालेभाज्या अशा सात्त्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. "गौरी आली रे" अशी भक्तिगीते गाऊन घराघरांत आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण केले जाते. श्रद्धाळूंचा विश्वास आहे की या उत्सवामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐक्य नांदते.
वडसा येथील जोहरी कुटुंबात ६३ वर्षांपासुन ही परंपरा सुरू असुन
श्री शंकर गोविंदराव जोहरी यांच्या निवासस्थानी यंदाही महालक्ष्मी पूजेचा ६३ वा वसा मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.
*स्थापना: ३१ ऑगस्ट २०२५ (भाद्रपद शुक्ल अष्टमी)*
*पूजन, आरती व महाप्रसाद: १ सप्टेंबर २०२५ (भाद्रपद शुक्ल नवमी) सायंकाळी*
ही परंपरा मूळचे ईटान (ता. लाखांदूर, जि. भंडारा) येथील स्व. बंडोजी भोगे यांनी सुरू केली होती. त्यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी हा वसा कन्या स्व. मनोरमा जोहरी यांच्याकडे सोपविला. तेव्हापासून जोहरी कुटुंब दरवर्षी हा उत्सव श्रद्धा-भक्तीने साजरा करत आहे.
🙏 यंदाही देवीचे पूजन, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम भव्यतेने पार पडणार असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जोहरी कुटुंबीयांनी केले आहे.
0 टिप्पण्या