शेगाव पोलीस स्टेशन येथील घटना.
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : वरोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या एका वृध्द शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शेगाव (खुर्द) येथे दि.३० ऑगस्टला सकाळी उघडकीस आली.
बँकेचे पिक कर्जाची रक्कम व कर्ज कसे फेडायला असमर्थता या विवंचनेत असलेले.
नामदेव कवडू गायकवाड, वय ६२ वर्ष, राहणार शेगाव (खुर्द) तालुका भद्रावती. असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपले जिवन संपविले.सदर मृत शेतकऱ्याकडे शेगाव येथे ६.८० हेक्टर शेती आहे.त्यात त्यांनी यावर्षी सोयाबीन व कपाशीच्या पिकाची लागवड केली आहे.मात्र त्यांच्या डोक्यावर शेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे एक लाखावर कर्ज असुन ते अनेक दिवसांपासून थकीत आहे.या विवंचनेतुनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलीस तथा महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.घटनेचा पुढील तपास शेगाव स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुमित कांबळे करीतआहे.
0 टिप्पण्या