चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : बल्लाळशाह नाट्यगृह,बल्लारपूर ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरचे सचिव,जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व माऊली ट्युशन, बल्लारपूरचे संस्थापक,आपल्या नाभिक समाजातील तडफदार व्यक्तिमत्त्व आदरणीय माननीय सुरज भाऊ नागतुरे यांच्या वतीने
एक भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये गणेश उत्सव,भविष्यातील भारत,स्त्री भ्रूण हत्या,
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या कलेचे मार्गदर्शन तसेच पालकांना पालकत्वाचे मार्गदर्शन देण्यासाठी आदरणीय वक्ते श्री.मनीष तिवारी सर व श्री. सुजीत मंडल सर यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
हा गौरवशाली सत्कार महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय माजी मंत्री
तसेच पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाला विशेष मान्यवराची उपस्थिती लाभली चंदन सिंह चंदेलजी(अध्यक्ष, वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य)
माननीय श्री. हरीशभैय्या शर्माजी
(माजी नगराध्यक्ष बल्लारपूर व भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष)
या भव्य कार्यक्रमात जय जिवाजी क्रांती सेनाचे उपस्थित गणेश वनकर अध्यक्ष, जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य ज्योतीताई लांडगे महिला अध्यक्ष, जय जिवाजी क्रांती सेना देवेंद्रजी वाटकर सल्लागार, जय जिवाजी क्रांती सेना यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने संपन्न झाला.
0 टिप्पण्या