Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच राहतो पुणे,ग्रामस्थांचे झाले उणे,बिलगांव ग्रामपंचायतचा कारभार चालवतो सरपंच मुलीचा बाप!

सरपंचाला पदावरून हटविण्याची बिरसा फायटर्ससह २५० ग्रामस्थांची  मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :- ग्रामपंचायत बिलगांव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या सन २०२२ मध्ये  निवडून आल्यापासून कायमस्वरूपी पुणे येथे जबील सर्कीट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी व  कामानिमित्त गेल्यानंतर सरपंचाच्या नावावर, सरपंचाच्या गैरहजेरीत सरपंचाचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायतचा अनागोंधी कारभार चालवित आहेत, ग्रामपंचायत बिलगांव येथे मुख्यालयी न राहणा-या ,ग्रामपंचायतच्या जबाबदारीत व कर्तव्यात कसूर करणा-या सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांना पदावरून हटवा ,त्यांना अपात्र करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेसह बिलगांव येथील २५० पेक्षा ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहेत.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,धडगांव चे सुरतान पावरा,वनकर पावरा,सुकलाल पावरा, सेल्या पावरा, पारध्या पावरा, बाहदुर पावरा,विरसिग पावरा आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

                            .सरपंच हा गावाचा मुख्य प्रतिनिधी असल्याने त्याला गावाच्या विकासासाठी व लोकांसाठी काम करण्याची मोठी जबाबदारी असते.गावातील रस्ते बांधणे,दुरूस्त करणे,दिवाबत्ती करणे,पिण्याच्या पाण्याची सोय करणे,सांडपाण्याची व्यवस्था करणे,सार्वजनिक स्वच्छता राखणे,शिक्षण व आरोग्य विषयक सोयी पुरवणे ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान भुषवणे व इतीवृत्तांची नोंद करणे, गावाच्या विकासासाठी योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ,शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवणे व त्यांचा लाभ मिळवून देणे इत्यादी सर्व कामे सरपंचाला करावी लागतात. सरपंचाच्या स्वाक्षरीशिवाय  ग्रामपंचायत च्या बॅकेतील निधी काढता येत नाही.अनेक महत्त्वाच्या कागदपत्रावर सरपंचांच्या स्वाक्षरीशिवाय कामे पूर्ण होत नाहीत. म्हणून गांवाचा सरपंच हा स्थानिक रहिवाशी म्हणजेच गांवात कायमस्वरूपी राहणारा असणे अत्यावश्यक आहे.परंतू ग्रामपंचायत बिलगांव येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या सन २०२२ मध्ये  निवडून आल्यापासून जबील सर्कीट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरी कामानिमित्त नेहमीच पुणे येथे  राहतात.पुणे येथे त्या स्थायिक झाल्या आहेत. त्यामुळे गांवातील रहिवाशांना रहिवाशी दाखले व इतर महत्त्वपूर्ण कामाच्या दाखल्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी सरपंच ला शोधत फिरावे लागते.काही कागदपत्रांवर सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हेच सरपंचाची बनावट सही करून कारभार चालवत आहेत. ग्रामपंचायत बिलगांव चा पूर्ण प्रशासकीय कारभार सरपंच आशा जामसिंग पावरा ह्या त्यांच्या मुलीच्या नावावर मुलीच्या गैरहजेरीत वडील जामसिंग काल्या पावरा हेच चालवत आहेत. कागदपत्रावर बनावट ससपंचाच्या सह्या करून व सरपंचाच्या अनुपस्थित अन्य व्यक्तींमार्फत ग्रामपंचायतचा अनागोंधी कारभार सुरू आहे.सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा हे स्वतःच पुणे येथे राहून वडील जामसिंग काल्या पावरा यांच्या मार्फत ग्रामपंचायत बिलगांवचा कारभार चालवून शासनाची व गांवक-यांची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. म्हणून ग्रामपंचायत बिलगांवचे सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांनी ग्रामपंचायत कर्तव्यात व जबाबदारीत कसूर केल्याबद्दल अपात्र घोषित करून तात्काळ सरपंच पदावरून हटविण्यात यावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेसह बिलगांव येथील ग्रामस्थांनी सीईओ यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या