Ticker

6/recent/ticker-posts

अकोला बाजार येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात पाण्याची गळती....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ :-जिल्ह्यातील अकोला बाजार या गावी असलेल्या सिद्धार्थ बुद्ध विहारात गेल्या काही दिवसांपासून स्लॅबच्या पाण्याची गळती होत आहे. सोबतच विहाराच्या बाजूला असलेल्या नालीचे संपूर्ण पाणी विहारात येत असल्याने विहारात बसायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. सदर विहाराच्या इमारतीचे बांधकाम 2006 साली झाली असून, या इमारतीला आता जवळपास 20 वर्षे होत आहे.  वरून स्लॅप पूर्णपणे गळती धरत आहे. व ही इमारत कधीही कोसळू शकते. याबाबत ग्रामपंचायतकडे मागणी केली असता, अकोला बाजार येथील सरपंच श्री. योगेश राजूरकर यांनी विहाराची पाहणी केली व सध्याचा पर्याय म्हणून स्लॅब ची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. सर्व बौद्ध समाज बांधवांची एकच मागणी आहे की विहाराच्या इमारतीची नवीन बांधणी करून द्यावी व इमारतीच्या बाजूला असलेले नालीचे बांधकाम करावे, जेणेकरून पुन्हा कधीही नाल्याचे पाणी विहारात व परिसरात जाणार नाही. तसेच समाज बांधवांना प्रवचन देण्यासाठी  बौद्ध भिक्खू तिथे निवासी राहत असून त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो करिता सर्व समाज बांधवांकडून बौद्ध विहाराचे दुरुस्ती व नवीन बांधकामाची मागणी होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या