सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड:- अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात जे कलाकेंद्र चालु आहेत,त्या कलाकेंद्रावर शासनाने कायदेशीर कार्यवाई करावी या मागणीसाठी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे जामखेड तालुकाध्यक्ष सचिन दत्ताञय आजबे हे जामखेड तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
त्यांनी उपोषणापुर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जामखेड शहरात व परिसरात अवैध कलाकेंद्र चालु असुन तेथे कलेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत आहे.दररोज राञी 4 ते 5 वाजेपर्यंत हे कलाकेंद्र चालू असतात या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दि.25/12/2024 रोजी तक्रारी अर्ज वेळोवेळी दिलेले आहेत.
अवैध कलाकेंद्रामुळे बाहेरील गुन्हेगार हे जामखेडमध्ये वास्तव्यास असतात त्यामुळे जामखेड शहरातील नागरिक भयभीत झालेले आहेत.यासर्व कलाकेंद्र मालकांनी गुंड प्रवृतीचे लोक सांभाळले असुन यामुळे राजरोसपणे मारामारी होत आहे.जामखेड शहर व तालुका पुर्णपणे भयभीत झालेला आहे.तसेच उपोषणकर्ते सचिन आजबे हे दि-5/2/2025 रोजी उपोषणास बसले होते. आणि सोमवार दि. 27/10/2025 पासून आजबे हे तहसील कार्यालय जामखेड येथे उपोषणास बसले आहेत.
आज उपोषणास 3 दिवस झाले आहेत जो पर्यंत मला न्याय भेटत नाही तो पर्यत मी उपोषण सोडणार नाही असे त्यांनी सांगितले.
संबंधित कलाकेंद्रावर कायदेशीर कार्यवाई करण्यात यावी अशी मागणी देखील उपोषणकर्ते सचिन दत्ताञय आजबे यांनी केली आहे.
या उपोषणाला जामखेड शहर व तालुक्यातील काही नागरिकांनी पुर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे.


0 टिप्पण्या