चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या भद्रावती नगरीतील भद्रशेष महाराज नाग मंदिरात भव्य भजन मंडळाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक भजन मंडळांना टाळांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मान्यवर म्हणून ह. भ. प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर (कीर्तनकार) यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सुवर्णाताईंनी आपल्या प्रेरणादायी कीर्तन शैलीतून भक्ती, भजनप्रभाव, समाजसेवा आणि संस्कार यांचे महत्त्व सांगत उपस्थितांना प्रबोधनपर संदेश दिला.व ह. भ. प.केशवराव ताजने महाराज यांनी प्रस्तावनापर सुंदर माहिती दिली आणि पांमपट्टीवार ताई त्यांच्या सुमधुर वाणीतून मार्गदर्शन केले मान्यवरांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रम अधिक भावपूर्ण आणि भक्तिमय झाला.मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. टाळ, मृदंग, अभंग आणि नामस्मरणाच्या गजराने वातावरण पवित्र झाले होते. भजन मंडळातील कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना आध्यात्मिक आनंद दिला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रमेश जानबाजी मिलमिले
अध्यक्ष, योगेश अन्नाजी पांडे उपाध्यक्ष, निळकंठ केशवराव एकरे सचिव, मधुकर सांबाशिव सहारे
कोषाध्यक्ष, राजेश विलासराव पांडे सहसचिव प्रकाश श्रीहरी पाम्पट्टीवार विश्वस्त व मंदिराचे सेवाधिकारी आणि ह.भ.प मेश्राम महाराज, डाखरे महाराज नवघरे महाराज सरोदे महाराज प्रकाश पिंपळकर व
आयोजक मंडळ यांनी केले होते. यावेळी , विविध भजन मंडळांचे प्रमुख, स्थानिक मान्यवर तसेच अनेक हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करून कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरनाने व महाप्रसादाने करण्यात आली.भद्रशेष महाराज मंदिरातील हा सन्मान सोहळा भद्रावतीच्या सांस्कृतिक व भक्ती परंपरेचा आणखी एक सुंदर सोहळा ठरला असून, आयोजक मंडळींच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


0 टिप्पण्या